Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. (Majhi Ladki Bahin Yojana: Maharashtra government may recover funds with penalties from ineligible beneficiaries. Know the rules, updates, and possible impact on women in the state).
दंडासह वसुलीची शक्यता का निर्माण झाली?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अर्जदार महिलांच्या अर्जांची पुनर्पडताळणी होईल, असे स्पष्ट केले आहे.
- नियम मोडणाऱ्या महिलांमध्ये कोणत्या महिला येतात?
- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी गाडी आहे. किंवा महिलेच्या नावावर दुचाकी आहे.
- आधार कार्ड व बँक खात्यात वेगवेगळे नाव असलेल्या महिला.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, “नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांनी स्वतःहून नावे वगळून घ्यावी. अन्यथा अशा महिलांकडून दंडासह वसुली करावी.”
भुजबळांचे महत्त्वाचे वक्तव्य
- गरीब महिलांना या योजनेचा खरा लाभ मिळावा, हा उद्देश आहे.
- नियम मोडणाऱ्या महिलांनी नावे वगळली नाहीत, तर सरकारकडून दंडासहित रक्कम वसूल होईल.
- परंतु, याआधी दिलेले पैसे परत मागणे योग्य नाही.
महिलांसाठी सरकारची सूचना
- ज्या महिला निकषात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपली नावे वगळून घ्यावी.
- नियमांचे पालन करूनच योजनेचा लाभ घ्यावा.
🔥 हेही वाचा 👉 BIG NEWS : 1.27 कोटी महिलांच्या खात्यात आज 1,553 कोटी रुपये होणार जमा, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होईल का.
योजनेच्या नवीन निर्णयांकडे लक्ष
महायुती सरकारने दर महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्या लाडकी बहीण योजनेत (Mazi Ladki Bahin Yojana) नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांवर होणारी दंडात्मक कारवाई मोठी बातमी ठरत आहे.
🔥 हेही वाचा 👉 सोन्याची आजची किंमत 13 जानेवारी 2025.
सरकारकडून याबाबत आणखी स्पष्टता येणे अपेक्षित आहे.