Majhi Ladki Bahin Yojana : क्रॉस-वेरिफिकेशनमुळे ‘या’ 24 लाख लाडक्या बहिणी अपात्र

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Update Beneficiary Verification Disqualified List

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Update Beneficiary Verification: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ 2.40 कोटींपेक्षा जास्त महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1500 जमा केले जात आहेत. मात्र, राज्य सरकारच्या नव्या क्रॉस-वेरिफिकेशन प्रक्रियेमुळे सुमारे 24 लाख लाभार्थी महिला अपात्र (ladki bahin yojana disqualified list) ठरण्याची शक्यता आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Latest News: Maharashtra’s scheme faces scrutiny as beneficiary verification may render 24 lakh women ineligible. Learn about eligibility criteria and updates here).

काय आहे माझी लाडकी बहीण योजना?


1 जुलै 2024 पासून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 चे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देणे हा आहे.

अपात्र होण्याची कारणे


Ladki Bahin Yojana Apatra List: राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की सर्व लाभार्थ्यांचे क्रॉस-वेरिफिकेशन होईल. यामध्ये खालील प्रकरणांमध्ये लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते:

  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास.
  • कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असल्यास.
  • महिलेच्या नावे दुचाकी वाहन असल्यास.
  • लाभार्थी महिला राज्याबाहेर स्थायिक झाल्यास.
  • डोमिसाइल प्रमाणपत्र नसल्यास.
  • आधार बँक खात्याशी लिंक नसल्यास.
  • अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास.

क्रॉस-वेरिफिकेशनमुळे 24 लाख लाभार्थींवर परिणाम?


महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे 10% लाभार्थींची नावे वागळली जाऊ शकतात. यामध्ये 24 लाख महिलांचा समावेश होऊ शकतो.

🔥 हेही वाचा 👉 महिलांना जानेवारी महिन्यात किती रुपये हफ्ता मिळणार? जाणून घ्या सविस्तर.

जाचक अटींवर सरकारचे स्पष्टीकरण


महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, फक्त तक्रारींच्या आधारे तपासनी केली जाईल. बीपीएल श्रेणीत येणाऱ्या 60-70% लाभार्थी महिलांचे वेरिफिकेशन करण्याची आवश्यकता नाही.

आर्थिक आव्हाने आणि योजना राबविण्याचा सरकारचा दृष्टिकोन


राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक ₹46,000 कोटी खर्चाची तरतूद केली आहे. परंतु, हफ्ता वाढवून ₹2,100 करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त ₹63,000 कोटींचा अंदाजित खर्च सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.

🔥 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना २१०० रुपये पुढील आर्थिक वर्षात.

माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वाची आहे, मात्र वाढत्या आर्थिक भारामुळे सरकारवर ताण येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अटी आणि नियम (Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria 2025) समजून घेऊन पुढील निर्णयासाठी तयार राहावे.

🔥 हेही वाचा 👉 बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी तरतूद होणार.

Share This Article