Majhi Ladki Bahin Yojana January Payment Update : महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने राबवलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. योजनेनुसार महिलांना दर महिन्याला ₹1500 मिळतात. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर निधी ₹2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे यावर्षीच्या सुरुवातीला महिलांना किती निधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Get the latest update on Majhi Ladki Bahin Yojana January payment. Will women receive ₹1500 or ₹2100 this month? Find out the eligibility rules and official announcements).
🔥 लेटेस्ट अपडेट 👉 BIG NEWS : 1.27 कोटी महिलांच्या खात्यात आज 1,553 कोटी रुपये होणार जमा, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड.
₹2100 चा हप्ता कधीपासून मिळणार?
डिसेंबर महिन्यात महिलांना ₹1500 चाच हप्ता वितरित करण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ₹2100 चा हप्ता सुरू होईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातदेखील महिलांना ₹1500 चाच हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, 80,000 रुपयांजवळ पोहोचला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव.
महिलांना योजना निवडीचे स्वातंत्र्य
लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांना इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. जर एखादी महिला पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असेल, तर तिला एकाच योजनेचा लाभ घ्यावा लागेल.
महिलांमध्ये संभ्रम
विधानसभा निवडणुकीनंतर निधी वाढीचा निर्णय झाला नाही, यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, महिलांनी योजनेबद्दल अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल.
🔥 हेही वाचा 👉 मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार हप्ता! जाणून घ्या सविस्तर.