मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार हप्ता! जाणून घ्या सविस्तर Ladki Bahin Yojana January 2025 Installment Date

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana January 2025 Update

Majhi Ladki Bahin Yojana January 2025 Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकार लवकरच योजनेचा सातवा हप्ता जारी करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (Ladki Bahin Yojana January 2025 Installment Date) मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे यंदाची मकरसंक्रांत लाडक्या बहिणींसाठी विशेष गोड होणार आहे. (Majhi Ladki Bahin Yojana January 2025 update: Government to deposit ₹1500 on Makar Sankranti in beneficiaries’ accounts. Check eligibility and details about the 7th installment).

महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार


राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये माझी लाडकी बहीण योजना (Mazii Ladki Bahin Yojana) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. 2024 वर्षभरात 9000 रुपये जमा झाल्यानंतर आता महिलांना जानेवारी 2025 चा सातवा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे.

कधी मिळणार हप्ता?


Ladki Bahin Yojana January 2025 Installment Date: मकरसंक्रांतीचा मुहूर्त लक्षात घेऊन 14 जानेवारीला हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांना या महिन्याच्या हप्त्यासाठी आता फार वाट पाहावी लागणार नाही.

अर्जांची छाननी सुरू


लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू असून, नियमांनुसार निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज फेटाळण्यात येत आहेत. यामध्ये इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधी किंवा अन्य योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ नाकारला जाण्याची शक्यता आहे.

🔥 हेही वाचा 👉 सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, 80,000 रुपयांजवळ पोहोचला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव.

महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट्स

  1. सातवा हप्ता: 1500 रुपये
  2. मकरसंक्रांती: 14 जानेवारी 2025
  3. अर्जांची छाननी: पात्र महिलांच्याच खात्यात होणार रक्कम जमा

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मिळणाऱ्या या हप्त्यामुळे महिलांची संक्रांत गोड होणार आहे.

🔥 हेही वाचा 👉 रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; रेशन कार्ड पूर्णतः बंद! आता मिळणार ई-रेशन कार्ड.

Share This Article