या सरकारी योजनेत दररोज फक्त ७ रुपये गुंतवा आणि मिळवा दर महिन्याला ५००० रुपये पेन्शन! Atal Pension Yojana 2025

2 Min Read
Atal Pension Yojana Invest 7 Rupees Daily Get 5000 Monthly Pension

Atal Pension Yojana 2025: केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी सुरु केलेली अटल पेन्शन योजना ही एक आकर्षक आणि विश्वासार्ह निवृत्ती योजना आहे. या योजनेत रोज केवळ ७ रुपये गुंतवून तुम्ही निवृत्तीनंतर दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकता. (Invest just 7 rupees daily in Atal Pension Scheme & get up to 5000 rupees monthly pension after retirement. Secure your financial future with a government-backed pension plan).

अटल पेन्शन योजना कशासाठी?


सेवानिवृत्तीनंतर नियमित आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी (Atal Pension Yojana) ही योजना १८ ते ४० वयोगटातील नागरिकांसाठी राबवण्यात येते. या योजनेत तुम्हाला किमान २० वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा निवृत्तीनंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होतो.

कसा मिळतो ५००० रुपयांचा लाभ?


जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सहभागी झालात, तर तुम्हाला दर महिन्याला फक्त २१० रुपये (रोज ७ रुपये) जमा करावे लागतील. त्यानंतर ६० व्या वर्षांपासून तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपये पेन्शन मिळेल.

योजनेचे प्रमुख फायदे:

  1. पेन्शन निवड: तुम्ही १००० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंतची पेन्शन निवडू शकता.
  2. दाम्पत्य लाभ: पती-पत्नी दोघांनीही या योजनेचा लाभ घेतल्यास एकत्रित १०,००० रुपयांची पेन्शन मिळू शकते.
  3. करसवलत: कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेता येतो.
  4. सुरक्षितता: ही एक सरकारी योजना असल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे.

गुंतवणूक किती करावी लागते?

  • १००० रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला फक्त ४२ रुपये भरावे लागतात.
  • ५००० रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला २१० रुपये भरावे लागतात.

🔥 हेही वाचा 👉 सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, 80,000 रुपयांजवळ पोहोचला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव.

कोण सहभागी होऊ शकतो?

  • वय: १८ ते ४० वर्षे असणारे भारतीय नागरिक.
  • किमान २० वर्षांची गुंतवणूक गरजेची आहे.

🔥 हेही वाचा 👉 मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार हप्ता! जाणून घ्या सविस्तर.

निवृत्तीनंतरच्या आयुष्याला आर्थिकदृष्ट्या सुनिश्चिंत करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. लहानशा गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवायचा असल्यास अटल पेन्शन योजना हा एक उत्तम पर्याय आहे.

Share This Article