Ladki Bahin Free Scooty Yojana 2025: या लाडक्या बहिणींना ₹1,500 च्या मासिक सहाय्याशिवाय मोफत स्कूटी? सरकारने स्पष्ट केले

3 Min Read
Ladki Bahin Free Scooty Yojana 2025 Fake News Alert Maharashtra

Ladki Bahin Free Scooty Yojana 2025 Fake News Alert : महाराष्ट्रातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेली ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1,500 च्या आर्थिक सहाय्याचा लाभ दिला जातो. मात्र, अलीकडे सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही संदेशांमध्ये दावा करण्यात येत आहे की या योजनेअंतर्गत महिलांना मोफत स्कूटी देखील दिली जाणार आहे. पण आता ती बातमी सत्य नसून पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे सोशल मीडियावर फिरणारा संदेश?


संदेशांमध्ये म्हटले जात आहे की, ‘माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ₹1,500 च्या मासिक सहाय्याशिवाय मोफत स्कूटी दिली जाते आहे. अनेक ठिकाणी या संदेशांमुळे महिलांमध्ये संभ्रम पसरला आहे.

सरकारची भूमिका?


महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण मोफत स्कूटी योजना (Ladki Bahin Free Scooty Yojana 2025) अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही. सध्या, ‘माझी लाडकी बहीण योजना’ फक्त मासिक आर्थिक सहाय्यासाठी राबवली जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण मोफत स्कूटी योजनेचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

🔥 हेही वाचा 👉 1.27 कोटी महिलांच्या खात्यात आज 1,553 कोटी रुपये होणार जमा, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होईल.

खोट्या बातम्या कशा ओळखाव्यात?

  1. अधिकृत सरकारी वेबसाईटची पडताळणी करा.
  2. फक्त विश्वासार्ह वृत्तसंस्था किंवा संकेतस्थळांवरील बातम्या वाचा.
  3. अशा खोट्या संदेशांवर त्वरित विश्वास ठेवू नका.

🔥 लेटेस्ट अपडेट 👉 ६० लाखांहून लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जाईल; ठाकरे गटाचा गंभीर आरोप.

महिलांनी काय खबरदारी घ्यावी?

  • आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता राखा.
  • अशा खोट्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करू नका.
  • महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट्स आणि माध्यमांवरूनच योग्य माहिती मिळवा.

🔥 हेही वाचा 👉 या महिलांना 1500 रुपये सुद्धा नाहीत मिळणार, अर्ज होणार बाद.

अधिकृत योजनेचा लाभ कसा घ्याल?


‘माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत फक्त पात्र महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सूरू करण्यात आलेली नाही.

‘माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) मोफत स्कूटी दिली जात नाही. महिलांनी कोणत्याही खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि आपली फसवणूक टाळावी. विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी अधिकृत स्रोतांचा उपयोग करा.

🔴 हेही वाचा 👉 ‘माझी लाडकी बहीण योजना’ लवकरच बंद होणार? – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण.

Share This Article