Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra: महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण योजने’च्या (Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना जानेवारी 2025 च्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना योजने’ अंतर्गत आज 1.27 कोटी महिलांच्या खात्यात 1,553 कोटी रुपये जमा होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार देखील राज्यातील महिलांच्या खात्यात ‘माझी लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हफ्ता आज जमा करून लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करू शकते.
महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे. मागील महिन्यातील हप्ता डिसेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आला होता. आत्ता पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात एकूण 6 महिन्याचे हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra: मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. लाभार्थींनी त्यांच्या बँक खात्यांची नियमितपणे पडताळणी करावी आणि अधिकृत घोषनेची वाट पाहावी.
🔴 मोठी अपडेट 👉 या महिलांना 1500 रुपये सुद्धा नाहीत मिळणार, अर्ज होणार बाद.
‘माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. सरकारने सत्तेत परतल्यास ही रक्कम 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच ते आश्वासन पूर्ण करम्याची हमी दिली आहे.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट समोर, योजनेतील लाभार्थी महिलांमध्ये चिंता वाढली.