ठरल तर मग! या महिला राहणार जानेवारीच्या हफ्त्यापासून वंचित, Majhi Ladki Bahin Yojana January 2025 Installment Update

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana January 2025 Installment Update

Majhi Ladki Bahin Yojana January 2025 Installment Update : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिन योजना” सुरु केली आहे, ज्यामुळे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ करोडो महिलांना मिळत आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी मिळणार याकडे लागले आहे. परंतु काही महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही, कारण योजनेत काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. (Check the latest update on Mazi Ladki Bahin Yojana. Some women won’t receive the Majhi Ladki Bahin Yojana January 2025 installment due to new criteria. Find out who is eligible and why).


महत्वाची अपडेट:


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंमलात आणण्यासाठी काही ठराविक अटी लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी लागते आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे, ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, किंवा ज्या महिलेच्या नावावर दुचाकी आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहिन योजनेचे इतर महत्त्वाचे निकष:

  • २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • कुटुंबाच्या उत्पन्नाच्या मर्यादेची अट पूर्ण करणाऱ्यांनाच लाभ.
  • इतर सरकारी योजनेतुन आर्थिक लाभ मिळत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कुणाला मिळणार नाही जानेवारी महिन्याचा हप्ता?


ज्या महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे, अशा महिलांना लाडकी बहिन योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. अशा महिलांना आता निर्णय घ्यावा लागेल की त्यांना कोणत्या योजनेचा लाभ हवा आहे. माझी लाडकी बहिन योजना (Mazi Ladki Bahin Yojana) महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे, परंतु ताज्या अपडेट्सनुसार, योजनेतून काही लाभार्थी वंचित राहणार आहेत.

🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; अपात्र लाभार्थ्यांची चौकशी.

Share This Article