LIC Vima Sakhi Yojana Women Empowerment Benefits: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) विशेषतः महिलांसाठी सुरु केलेल्या विमा सखी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच महिन्यात ५२,५११ महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून, २७,६९५ महिलांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. (LIC Vima Sakhi Yojana offers women a monthly honorarium of up to ₹7,000 and commission on policies. Empowering women with jobs, skills, and financial independence).
विमा सखी योजना कशी काम करते?
Vima Sakhi Yojana In Marathi: विमा सखी योजनेच्या (LIC Vima Sakhi Yojana 2025) माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका विमा सखीची नेमणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास, डिजिटल साधने आणि व्यावसायिक मार्गदर्शन दिले जाते. या योजनेतुन तीन वर्षांसाठी मासिक मानधनाचा लाभ मिळतो:
- पहिल्या वर्षी: ७,००० रुपये मासिक
- दुसऱ्या वर्षी: ६,००० रुपये मासिक
- तिसऱ्या वर्षी: ५,००० रुपये मासिक
याशिवाय, त्यांनी केलेल्या एकूण विमा पॉलिसीवर अतिरिक्त कमिशन मिळवण्याची संधीही महिलांना मिळते.
विमा सखी योजना पात्रता निकष:
- वय: १८ ते ७० वर्षे
- शिक्षण: दहावी पास
- आर्थिक सक्षमीकरणासाठी उत्सुक महिलांना या योजनेत सहभागी होता येईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना २१०० रुपये पुढील आर्थिक वर्षात? विरोधकांकडून सरकारवर दबाव.
महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल
एलआयसीच्या या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनण्याची संधी मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ दृष्टिकोनातून साकारलेली ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना नवी उंची गाठण्यासाठी प्रोत्साहन देते.
भविष्यातील उद्दिष्ट:
एलआयसीने पुढील तीन वर्षांत २ लाख विमा सखींची भरती करण्याचा संकल्प केला आहे. ही योजना महिलांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण करत आहे.
इच्छुक महिलांनी (LIC Vima Sakhi Yojana) या योजनेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रवासात सामील व्हावे.
🔥 हेही वाचा 👉 2025-26 केंद्रीय बजेटमध्ये महिलांसाठी मोठी तरतूद होणार.
(सूचना: अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधा.)