Budget 2025 Women Empowerment Majhi Ladki Bahin Yojana Updates : 2025-26 च केंद्रीय बजेट महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) आणि मध्यप्रदेशातील लाडली बेहना (Ladli Behna Yojana) योजनेच्या यशस्वी मॉडेल्सवरून प्रेरणा घेत, या बजेटमध्ये महिलांना थेट लाभ देणाऱ्या योजनांना भरीव निधी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. (Budget 2025 highlights: Major focus on women empowerment with potential allocation for Majhi Ladki Bahin Yojana. Key updates on women-centric schemes and financial support in Budget 2025).
महिला केंद्रित योजनांचे यश
2019 ते 2024 या दरम्यान केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला. मुद्रा योजनेंतर्गत लघु व मध्यम उद्योगांत महिलांचा सहभाग वाढला, तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2 दशलक्ष महिलांच्या घरकुलाचे स्वप्न साकार झाले. अशा योजनांमुळे महिला मतदार सरकारशी जोडल्या गेल्या आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी पुढील पावले
या वर्षीच्या बजेटमध्ये डिजिटल साक्षरता, महिला स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन, महिला उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य, रोजगार संधी, आरोग्य आणि स्वच्छता यावर अधिक भर दिला जाईल, अशी शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांची उत्पादने बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी नवीन योजना आणल्या जाऊ शकतात.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना २१०० रुपये पुढील आर्थिक वर्षात? विरोधकांकडून सरकारवर दबाव.
2024-25 बजेटचा अनुभव
गेल्या बजेटमध्ये मिशन शक्ती, नोकरदार महिलांसाठी होस्टेल, कौशल्य विकास कार्यक्रम, क्रेच सुविधा, आणि महिला सुरक्षेसाठी उपक्रम सुरू करण्यात आले. यंदाचे बजेट या पुढाकारांवर अधारित नवे प्रकल्प आणण्याची शक्यता आहे.
महिला मतदारांना जपण्याचे धोरण
आगामी लोकसभा निवडणुका जरी 5 वर्षांनी असल्या तरी महिला मतदारांचा विश्वास कायम राखण्यासाठी सरकारकडून मजबूत आर्थिक योजना जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.
नव्या योजनेची अपेक्षा
महिला सक्षमीकरणाचा व्यापक विचार करून आरोग्य, स्वच्छता, आणि ग्रामीण महिलांसाठी उपयुक्त धोरणे आखण्यात येतील. महिलांसाठी स्टार्टअप, कौशल्य विकास, आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिल्यास देशातील महिला वर्गाच्या विकासाला गती मिळेल.
2025-26 चे केंद्रीय बजेट महिलांसाठी क्रांतिकारक ठरू शकते. थेट लाभ देणाऱ्या योजनांपासून डिजिटल प्रगतीपर्यंत महिलांसाठी नवनवीन धोरणे राबवली गेल्यास महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण साध्य होईल.
🔴 हेही वाचा 👉 ठरल तर मग! या महिला राहणार जानेवारीच्या हफ्त्यापासून वंचित.