SBI Har Ghar Lakhpati Yojana Investment Scheme Details: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अद्भुत योजना सुरु केली आहे. ‘हर घर लखपती योजना’ या योजनेअंतर्गत, तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी बचत गुंतवून लाखो रुपये जमा करू शकता. ही एक रिकरिंग डिपॉझिट (RD) प्रकारची योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला नियमितपणे पैसे गुंतवावे लागतात आणि यातून तुम्ही आकर्षक व्याजदरावर मोठी रक्कम जमा करू शकता. (SBI’s Har Ghar Lakhpati scheme offers attractive interest rates, allowing you to invest as little as ₹80/day to become a lakhpati. Know the details).
‘हर घर लखपती’ योजनेत (Har Ghar Lakhpati Yojana) ३ ते १० वर्षांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये, सामान्य नागरिकांना ६.७५% व्याजदर मिळतो, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२५% व्याजदर मिळतो. एसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेत ८% व्याजदर उपलब्ध आहे.
🔥 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह? सरकारचा बचाव!.
सर्वसाधारणत: एका महिन्यात तुम्ही दररोज ८० रुपये बचत केली, तर तुमची मासिक बचत २५०० रुपये होईल. याप्रमाणे या योजनेत दररोज ८० रुपये बचत करून दरमहा २५०० रुपये गुंतवून, तुम्ही ३ वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडनंतर १ लाख रुपये जमा करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे ज्यामुळे तुम्ही आर्थिक सुरक्षितता साधू शकता आणि अल्प बचतीत १ लाख रुपये जमा करू शकता.
🔥 हेही वाचा 👉 या सरकारी योजनेत दररोज फक्त ७ रुपये गुंतवा आणि मिळवा दर महिन्याला ५००० रुपये पेन्शन!.