PM Ujjwala Yojana Subsidy Increase Lpg Usage Rise : पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सबसिडी वाढल्यानंतर लाभार्थी महिलांच्या गॅस सिलेंडर वापरामध्ये लक्षनीय वाढ झाली आहे. यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उज्ज्वला योजनेचा गॅस सिलेंडर वापर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अद्याप कमी असला, तरी योजनेच्या विस्तारामुळे गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, अशी आशा आहे. (PM Ujjwala Scheme sees a rise in LPG usage due to subsidy increase. Beneficiaries now use 30% more cylinders annually. Govt plans new LPG connections to aid poor families).
गॅस सिलेंडर वापरामध्ये 30% वाढ
पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उज्ज्वला योजनेतील लाभार्थी 2020-21 मध्ये दरवर्षी सरासरी 3.95 सिलेंडर वापरत होते, तर 2023-24 मध्ये हा आकडा 4.34 सिलेंडरवर पोहोचला आहे. यामागे सबसिडी वाढ हा महत्त्वाचा घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे लाभार्थ्यांचा आर्थिक भार कमी झाल्यासारखे वाटत असल्याचे दिसते.
सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अजूनही कमी वापर
सामान्य गॅस ग्राहक वर्षाकाठी 7 ते 8 सिलेंडर वापरतात, तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा वापर याच्या निम्म्याच्या जवळपास आहे. मात्र, सबसिडीमुळे या महिलांना गॅस सिलेंडरचा अधिक वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
सरकार देणार नवीन गॅस कनेक्शन
केंद्र सरकार उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. येत्या अर्थसंकल्पात नव्या कनेक्शनसाठी विशेष घोषणा (PM Ujjwala Yojana 2025) होण्याची शक्यता आहे. यामुळे अधिक गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन उपलब्ध होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना राजकीय दृष्टिकोनातूनही भाजपासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
🔥 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना २१०० रुपये पुढील आर्थिक वर्षात? विरोधकांकडून सरकारवर दबाव.
उज्ज्वला 2.0 पात्रता व आवश्यक कागदपत्रे
पिएम उज्ज्वला योजनेसाठी 18 वर्षांवरील महिलाच पात्र आहेत. ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आहेत, तसेच त्यांच्या घरात आधीपासून कोणतेही गॅस कनेक्शन नसावे. अनुसूचित जाती-जमाती, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थी आणि अन्य गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
अर्जासाठी आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड आणि बँक खाते क्रमांक यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते.
योजनेचा उद्देश आणि सामाजिक
उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पर्याय देणे हा आहे. यामुळे केवळ महिलांचे आरोग्य सुधारत नाही, तर त्यांच्या कुटुंबाचे जीवनमानही उंचावते. सबसिडी वाढ आणि नव्या कनेक्शनमुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब कुटुंबांना होईल.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; अपात्र लाभार्थ्यांची चौकशी, विरोधक आणि मंत्र्यांचे आरोप.